कोबीचे भजी/ cabbage pakode

नमस्कार मित्रांनो आज आपण कोबीचे भजी कसे बनवतात हे बघणार आहोत.cabbage pakole हे खूप मस्त लागतात. पावसाच्या दिवसात वातावरण थंड असतं खूप पाऊस बाहेर पडत असताना मस्त गरम गरम कांदा भजी खावेसे वाटतात. आज आपण कांद्याचे भजी न करता कोबीचे भजी करणार आहोत. हे कांदा भजी सारखेच कुरकुरीत आणि खमंग cabbage pakode लागतात. भजी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. मग चला तर आज आपण cabbage pakode रेसिपी ला लागणारे साहित्य पाहून घेऊया.

साहित्य:-

  • 200 ग्रॅम उभा पातळ चिरलेला कोबी
  • 25 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 150 ग्रॅम बेसन पीठ
  • 2 छोटा चमचा तांदळाचे पीठ
  • 1 चमचा हळद
  • 1मोठा चमचा तिखट ( आवडी नुसार कमी -जास्त)
  • चवी नुसार मीठ
  • आवडी नुसार ओवा
  • 500ml तेल
  • अर्धी वाटी पाणी (आवश्यक असल्यास कमी जास्त घ्यावे.

कृती:-

  1. सगळ्यात आधी कोबी उभा पातळ चिरून घ्यायचा. जस कांदा भजी साठी बारीक पातळ उभा चिरतो तसाच कोबी पण चिरून घ्यायचा.

2. त्यानंतर उभा चिरून घेतलेला कोबी मध्ये चवीनुसार मीठ घालून तो कोबी चांगला मिठामध्ये फिरवून घ्यायचा.

3 . कोबी मिठामध्ये व्यवस्थित चिरून मिक्स करून झाला की दहा मिनिटं तसाच ठेवून द्यायचा.

4. 10 मिनिट झाली की त्याच्यामध्ये एक चमचा हळद घालून घ्यायची.

5. मग त्याच्यामध्ये एक चमचा तिखट घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं.

6. त्याच्यानंतर बेसन पीठ घालून सर्व मिक्स करून घ्यायचं व तांदळाचे पीठ देखील घालून घ्यायचं .

7. हे सर्व घालून झालं की मग चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची व मिक्स करून घ्यायचं.

8 . हे सर्व मिश्रण एकत्र करून झालं की दुसरीकडे गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं.

9 . आता तेल गरम झालं आहे आता आपण छोटे छोटे आकाराचे गोळे करून तेलामध्ये हलक्या हाताने तळण्यासाठी सोडावे.

10 . गॅस मंद आचेवर ठेवून भजी एकदाच टाकून घ्यायचे सगळे भजी तेलामध्ये सोडून झाले की हलक्या हाताने फिरवत राहायचं नाहीतर एकाच बाजूने शिजले जातात.

11 . गॅस मंद आचेवर ठेवल्यामुळे भजी आतपर्यंत व्यवस्थित चांगले तळले जातात आणि करपले जात नाहीत .

12 . भाजी लालसर होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे मग त्यांना कुरकुरीत पणा येतो.

13 . चला तर मग भजी लालसर असे तळून झाले आहेत आता ते एका डिशमध्ये काढून घेऊया.

14 . हे हे भजी आपण असेच पण खाऊ शकतो आणि बेसनाचा चुरा असतो तो आणि लसूण व लाल तिखट याची सुक चटणी करून त्याच्यासोबत खूप कमाल भजी लागतात.

टिपः-

कोबीचे भजी तुम्ही साईड डिश म्हणून किंवा असेच पण टाईमपास म्हणून खाऊ शकता.


Posted

in

,

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *