घावणे / ghavne

नमस्कार मित्रांनो आज आपण साध्या सोप्या पद्धतीने झटपट बनणारे घावणे कसे बनवतात ते बघणार आहोत. लहान मुलांना चहा चहा सोबतचा गरमागरम मेनू आहे ghavne हा पदार्थ दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारा पदार्थ आहे . हा सकाळचा नाष्टा काय बनवायचं असं वाटलं की रोज रोज तेच खाऊन कंटाळा आला असेल तर गरमागरम चहा सोबत नाष्ट्याला ghavne करून खाऊ शकतो. चला तर मग घावणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया.

साहित्य:-

  • तांदळाचे पीठ 250g
  • मिठ
  • 2 मोठे चमचा तेल
  • 1 ग्लास पाणी ( गरजे नुसार घेणे लागल्यास)
  • केलीच सोप
  • अर्धा चमचा हळद ( आवडी नुसार )
  • पॅन / भिड

कृती:-

1 . सगळ्यात आधी तांदळाचे पीठ घ्यायचे त्याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचे.

2 . जेवढे पीठ घेतले तेवढेच पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं.

3 . पीठ मिक्स करून झालं की पॅन किंवा भिडे गॅस वरती गरम करायला ठेवायचं.

4 . मग एका प्लेटमध्ये दोन मोठे जमीन तेल काढून घ्यायचं घावणे करताना पॅनला लावण्यासाठी.

5 . भिडे गरम करायला ठेवले होते ते आता गरम झाले आहे. त्याला तेलीच्या सोपान चांगल सगळी कडे तेल लावून घ्यायचं.

6 . तेल व्यवस्थित नाही लावलं तर घावणे नीट होत नाही. चिटकून कुस्करले जातात म्हणून ते नीट लावून घ्यायचं.

7 . आता पीठ मिक्स करून तसचं ठेवलं होतं ते पुन्हा मिक्स करायचं पाणी टाकतो त्यामुळे ते खूप पातळ असते थोडा वेळ झाला की पाणी वर आणि पीठ दोन तसेच खाली जमा होतं.

8 . त्यामुळे पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि आणि पेला किंवा मोठ्या चमच्याच्या साह्याने भिड्यामध्ये घावण्याचं पीठ पेला किंवा चमच्याच्या साह्याने पूर्णपणे भिड्यामध्ये सगळीकडे ओतून घ्यायचं.

9 . त्यानंतर त्याच्यावर लगेच झाकण ठेवून थोडं पाच मिनिटं वाफवायला द्यायचं.

10 . पाच वाफल की त्याच्यावर झाकण ठेवलेलं काढून टाकायचं तेल व्यवस्थित लावलं असेल तर त्याची कडा आपोआप निघते.

11 . कडा निघाली की पली त्याच्या साह्याने घावना उलटा परतून घ्यायचा आणि परत त्याला थोडा वेळ शेकायला द्यायचा.

12 . तो वरच्या बाजूने नीट वाफला नसेल तर पुन्हा उलटा करून शिकवायचा आहे.

13 . गॅस थोडासा मंद आचेवर ठेवून आवश्यक असल्यास कमी जास्त करू शकता.

14 . आता घावना व्यवस्थित शेकला गेला आहे मग तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा.

टिपः –

  • घावणे तुम्ही चहा सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता.
  • लहान मुलांच्या डब्यातून घावणे कोणत्याही भाजीसोबत देऊ शकता.

Posted

in

,

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *