नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला फणसाचे तळलेले गरे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. सर्व प्रथम jackfruit chips म्हटल की सगळ्यांचा तोंडाला पाणी सुटतं काही लोक फणसाचे तळलेले गरे तर काही लोक त्यालाच chips pn बोलतात. ‘ jackfruit chips ‘ बनवला थोडा वेळ लागतो पण खूप छान आणि कुरकुरीत असे होतात. Jack fruit आपल्या आरोग्य साठी फायदेशीर आहे. चला तर मग आपण रेसिपी आणि साहित्य पाहून घेऊया.
साहित्य :-
- कच्चा फणसाचे बारीक चिरलेले गरे ( ताजा फणस घायचा)
- खोबलेल तेल ( बाकी कोणत्याही तेलाचा वापर करू नये.)
- मिठ
- पाणी
कृती:
1 . सर्व प्रथम कच्चा फणस घ्यायचा ( कापा किंवा बरका फणस घेऊ शकता.)
2 . त्यानंतर फणस फोडून tyache गरे kadun घ्यायचे व ते कडून झाले की परत त्याची सांगुल काडून घ्यायची.
3 . गरे काढून घेतले की त्यातल्या बिया काडून गऱ्यांचे दोन भाग करुन बरिक आणि लांब पातळ चिरून घ्यायचे.
4 . त्यानंतर कडई मध्ये खोबरेल तेल गरम करायला ठेवायचं आहे.
5 . कडई मध्ये तेल गरम होत आहे ( गॅस मंद आचेवर ठेवायची आहे . )तो पर्यंत मिठ्याचे पाणी करुन घ्यायचे.
6 . आता तेल गरम झाल आहे. गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि तेल गरम झाल की नाही हे कस समजायचं तर तेल गरम झाल की तेलाचा थोडा वास येतो तो वास आला की समजायच तेल गरम झाल आहे.
7 . त्यानंतर त्याच्या मध्ये बारीक चिरलेले गरे थोडे थोडे करुन करायचे आहेत .एकदम सगळे टाकायचे नाहीत एकदम टाकल्याने एकमेकांना चिकटले जातात.
8 . गरे टाकून झाले की लगेच तेला मध्ये टाकलेल्या गऱ्यावर दोन दोन चमचे मिठाच पाणी टाकून घ्यायचे. पण पाणी तेला मध्ये टाकल्यावर तेल जास्त उडत नाही नेहमी सारखं त्यामुळे तेला मध्ये पाणी टाकायला घ्याबरायच नाही.
9 . गॅस मध्यम आचेवरच ठेवून गरे सावकाश हरक्या हाताने सारखे फिरवत तळून घ्यायचे आहे.
10 . गरे लालसर रंग होईपर्यंत मंद आचेवर फिरवत फिरवत तळून घ्यायचे आहे. खूप जास्त लालसर करायचे नाहीत नाय तर ते करपून जातील आणि मग त्यांची चव बदलेल.
11 . आता गरे छान असे लालसर तळून झाले आहेत आता आपण ते एका डिश मध्ये काढून घेऊया आणि आता तळलेले गरे तयार झाले आहेत.
टीप :-
- फणसाचे तळलेले गरे आपण असेच बसल्या बसल्या टाइमपास ला खावू शकतो.
- फणस हा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे.
- फणसामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.
- फणसामध्ये व्हिटॅमिन एक आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक असतात.
- फणस हृदयाची काळजी घेते आणि शुगर, रक्तदाब नियंत्रित करते.
- फणसाचे सेवन केल्याने कॅंन्सर , हृदयविकार, मधूमेह आणि डोळ्यांच्या मोतीबिंदूसारख्या समस्या होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
- फणसा पासून अजून काय काय होते ते मी तुम्हाला दाखवेन .
Leave a Reply