नमस्कार मित्रांनो आज आपण veg masala pulao bhat रेसिपी बघणार आहोत. Veg masala pulao bhat ही एक साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तुम्हाला घरामध्ये जे काही समान उपलब्ध असेल त्या मध्ये ही आपण झटपट veg masala pulao bhat 4 लोकांसाठी बनवू शकतो चला तर मग या रेसिपी चे साहित्य पाहून घेवूय
साहित्य :-
- बासमती तांदुळ 2 कप
- 3 बारीक चिरलेला गाजर
- 1 बटाटा
- फरसबी 8/10
- फॉवर तुकडे केलेला पावभाग
- 1 वाटी मटार
- शेंगदाणाने 10g
- 10/15 काजू
- एक कांदा
- अर्धा चमचा जिरे- मोहरी
- 3 चमचे तेल
- 2 तमालपत्र
- 1 टोमॅटो
- 1 चमचा आल-लसूण पेस्ट
- 1 चमचा दना पावडर
- अर्धा चमचा हळद
- 1 बिर्याणी मसाला
- 1/2 भोपळी मिरची
- 1 चमचा लाल तिखट
- 2/3 लवंग
- 2/3 काळीमिरी
- चवी नुसार मीठ
कृती:-
- सर्वप्रथम 2 कप बासमती तांदुळ घेऊया ( इथे तुम्ही कोणत्याही ब्रांडचे वापरू शकता घरचे किव्हा दुकानातू आणलेले. ) सर्वात आधी स्वच्छ पाण्यात 2/3 वेळा स्वच्छ धुऊन घेऊया. त्यानंतर तांदळा पेक्षा जास्त पाणी घेऊन 10/15 मिनिटं पाण्यात भिजत ठेऊया .
2. सर्व प्रकारच्या भाज्या स्वच्छ धुऊन चिरून घ्यावा फ्लॉवर, 2/3 गाजर, 1 बटाटा 8/10 भरसाबी 1 वाटी मटार, कांदा , भोपळी मिरची
3. त्यानंतर कुकर 2/3 चमचा तेल गरम करायला ठेवावे. त्याच्या मध्ये अर्धा चमचा जिरे- मोहरी, 2/3 तमालपत्र ,2/3 लवंग, गरजे प्रमाने डालचीन काळीमिरी मसालाफुल .मासालावेलची 1/2 हे सगळे खडे मसाले मंद आचेवर तेलात परतून घ्यावे.
4. मग त्या मध्ये बारीक चिरलेला कांदा लाल सर होई पर्यंत परतून घ्यावा ( मोठा उभा चिरलेला असेल तरी चालेल.) त्यानंतर आल-लसूण पेस्ट घालून घेऊया.
5. उभ्या चिरलेल्या 2 मिरच्या घालून घ्या ( शिजवून घ्यायची गरज नाही .) हे सर्व 2 मिनिट परतून घ्यावे आणि मग त्यामध्ये मसाले घालून घेवुया सर्वात आधी धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, बिर्याणी मसाला एक चमचा, लाल तिखट एक चमचा ( तुम्ही बिर्याणी मसाला ऐवजी काळा मसाला, गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरू शकता.)
6. त्यानंतर हे मसाले मिक्स करून घायचे आणि त्यामधे बारीक चिरलेल्या भाज्या घालून परतून घेऊया व त्या भाज्या आणि मसाले एकजीव करून घेऊया.
7. मग त्या मध्ये भिजत ठेवलेले तांदुळ पाण्यातून बाहेर कडून घेऊया. ( पाण्यात भिजत ठेवल्या मुळे तो तांदुळ छान असा फुललेला आहे .) आता त्या मधल सगळ पाणी नीचळून घायच आणि तो तांदुळ भाज्या मध्ये टाकून हलक्या हाताने मिक्स करून घेऊ .
8. आपण तांदूळ भिजत ठेवल्या मुळे जास्त पाणी टाकायचं नाही आहे त्यामुळं 2 कप तांदूळ आहे तर त्याचा मध्ये दुप्पट पाणी टाकायचं नाही नाय तर भात चिकट होऊन जाईल 2 कप आणि अर्धा कप पाणी घालू.
9. काजू घालू आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर त्याच्यावर तूप घालून घेऊया . तुपामुळे एक छान सुगंध येतो आणि भात सुटसुटीत आणि मोकळा होतो.
10. तुम्ही जर हा पुलाव कुकर मध्ये बनवत असाल तर (कुकर ची शिट्टी कडून टाकायची आहे. ) कुकर ची एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. तर खमंग असा पुलाव तयार झाला आहे टीप
टिपः –
आपण हा वेज मसाला पुलाव भातासोबत कोशिंबीर आणि लोणचे किंवा पापडासोबत खाऊ शकतो.
Leave a Reply