नमस्कार मित्रांनो, आज आपण फणसाच्या गऱ्याच्या फोडायची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे. फणस म्हटलं की सगळ्यांना आवडतोच . jackfruit vegetable चे 3 वेगवेगल्या प्रकारे करू शकतो त्यातला एक प्रकार आज मी दाखवणार आहे. Jackfruit vegetable ही खमंग आणि सुखी असते. ती तुम्ही कमीत कमी वेळात करू शकता . मग चला तर jackfruit vegetable चे साहित्य काय काय लागणार ते पाहून घेऊया.

साहित्य:-
- फाणसाचे कच्चे गरे (ताजा फणस घेणे)
- पाणी
- तेल 2 / te 3 चमच
- अर्ध्या चमचा जिरे – मोहरी
- 5 ते 6 लसूण पाकळ्या
- 5 ते 6 कडीपत्याची पाने
- एक चमच हळद
- लालतिखट 2 ते 3 चमच
- चवी नुसार मीठ
कृती:-
1 . सगळ्यात आधी फणसाचे आख्खे गरे काढुन घ्यायचे . आणि त्याची सांगुळ काढून टाकायची.

2 . त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकून ते पाणी थोड उकळून घायच आणि मग त्या पाण्यामध्ये कच्चे गरे घ्यालायचे आणि थोड शिजवून घ्यावे 15ते 20 मिनिट

3 . शिजवून झाले की थोड थंड व्हायला द्यायचे आणि दुसरी कडे कढई मध्ये 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या तेलामध्ये टाकायच्या.

4. लसूण पाकळ्या टाकून झाल्या की 5 ते 6 कडीपत्त्याची पाने टाकायची.

5. त्याच्यांनतर त्यांच्यामध्ये जिरे -मोहरी टाकायची आणि लसूण तेला मध्ये शिजायला दयायची .

6. त्याच्यानंतर एक चमचा हळद टाकून घ्यायची आणि गॅस मंद आचेवर ठेवायची नाय तर आपली फोडणी करपायची.

7. मग त्याचा मध्ये तिखट 2 ते 3 चमचे टाकायचं आणि चवी नुसार मीठ घालून घ्यायचं.

8. आता त्याचामध्ये गऱ्याचे भाग केलेले फोडणीत घालून घ्यायचं गॅस मंद आचेवर ठेवूनच करायचं आहे.

9 . आता ते सर्व मसाले आणि गऱ्याची फोड एकत्र मिक्स करुण घ्यायचं आहे.

10 . आता त्याचा मध्ये अजून थोड मिठ टाकून पुन्हा एकदा मिक्स करुण घ्यायचं.

10. त्यानंतर 5 ते 7 मिनिट कढईवर झाकण ठेवून थोडा वेळ तसच ठेवायच आणि थोड्या वेळानी काढायचं आता आपली फोडची भाजी तयार झाली आहे.

टीप:-
हि भाजी तुम्हीं टाईमपास साठी अशीच पण खावू शकता किंवा मग भाकरी सोबत नाय तर मग साईट भाजी म्हणून पण भात डाळ सोबत खावू शकता.
Leave a Reply