ढोकळा /dhokla recipe in marathi

नमस्कार मत्रांनो आज आपण ढोकळा इनो किंवा सोडा न वापरता कसा बनवायचा ते बागणार आहे. Dhokla recipe ही खुप कमीत कमी वेळात झटपट तयार होते. लहान मुलांना किंवा मोठांना नाश्ता साठी उत्तम आहे.dhokla recipe ही मऊसुत आणि जाळीदार ढोकळा अगदी सोप्या पद्धतीमध्ये तयार होतो. Dhokla recipe ही खुप चविष्ट आणि खमंग होते. चला तर मग आज आपण ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊ

साहित्य :-

  • बेसन पीठ दोन वाटी
  • बारीक रवा(आवडीनुसार)
  • हळद एक चमचा
  • मीठ आवश्यकतेनुसार
  • दही ( आवडीनुसार)
  • पाणी एक वाटी
  • साखर दोन चमचे
  • आलं एक छोटा तुकडा
  • मिरच्या चार ( उभ्या चिरलेल्या)
  • तेल दोन मोठे चमच
  • मोहरी
  • कढीपत्ता पाच-सहा पान
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती :-

  • सगळ्यात आधी दोन कप प्रमाणात बेसन घ्यायचं आणि ते नीट चालून घ्यायचं बेसन पीठ जसेच्या तसे घ्यायचं नाही जसेच्या तसे घेतलं तर पाण्यामध्ये मिक्स करताना त्याच्या गुठल्या तयार होतात.
  • पीठ नीट चालून घेतल्यानंतर पिठामध्ये हळद मीठ घालून पाणी न टाकता मिक्स करून घ्यायचं
  • एक वाटी पाणी घेऊन ते थोडे थोडे करून एका साईडनेच मिक्स करून पाणी हे प्रमाणातच घ्यायचं जास्त प्रमाणात घेतल्यामुळे आपलं मिश्रण पातळ होऊ शकत.
  • आता त्या मिश्रणामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट टाकून नीट मिक्स करून घ्यायचं मिश्रण मिक्स करताना लक्षात ठेवायचं नेहमी एकाच बाजूने मिक्स करायचं
  • ते सगळं मिक्स करून झालं की त्या मिश्रणामध्ये दोन छोटे चमच तेल घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं
  • आता आपण या मधे खायचा सोडा किंवा इनो चा वापर न करता हा ढोकळा बनवणार आहेत तर त्यासाठी आपल्याला हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवून सकाळी ते ढोकल्यासाठी तयार होईल छान असं मस्त फुलून येल.
  • आता आपण जे मिश्रण रात्रभर भिजत ठेवलं ते पाहूया. ते मिश्रण तयार झालं आहे आज मी कुकरमध्ये ढोकला न करता कढईमध्ये कसा बनवायचा तो दाखवणार आहे.
  • घ्यायची त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि कुकर चे स्टॅन्ड असेल तर नाहीतर एक डिश घेऊन ती कढई मध्ये उलटी टाकायची आणि त्याच्यावरती मिश्रणाचा डबा ठेवून झाकण ठेवून द्यायचं आणि पंधरा ते वीस मिनिटं वाफ द्यायची आता.
  • आता मिश्रण ठेवून 15 ते 20 मिनिटं झाले आहेत आता आपण कडेवरचे झाकण काढून सुरीच्या टोकाने पाहून घेऊया ढोकळा आपला तयार झाला की नाही तू साफ आली तर ढोकळा तयार झाला आहे. सुरी चटक साफ नाही आलं तर पुन्हा पाच मिनिटं वाफवून घ्यायचा आहे.
  • आता आपला ढोकळा तयार झाला आहे. गॅसवरून उतरून ढोकला थंड व्हायला द्यायचा. ढोकला थंड होईपर्यंत साखरेचे पाणी करून घ्यायचं.
  • साखरेचे पाणी करून झालं की त्या थंड झालेल्या ढोकल्याचे बारीक बारीक पीस करून घ्यायचे आणि मग मग त्याच्यावरती साखरेचे पाणी पूर्णपणे दोन चमचे भर टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण मुरायला द्यायचं.
  • ढोकळ्यावरती साखरेचे पाणी पाच मिनिटे मुरायला द्यायचं तोपर्यंत दुसरीकडे तेल दोन छोटे चमचे एक चमचा मोहरी दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या पाच सहा कढीपत्त्याची पानं याचा तडका तयार करूया.
  • तयार झालेला तडका ढोकळ्याचे बारीक बारीक पीस करून घेतलेले आहेत त्याच्यावरती तो गरम गरम तडका टाकून घ्यायचा. आणि दोन ते तीन मिनिटे थंड व्हायला द्यायचं
  • ढोकल्यावर ती छान असा तडका देऊन झाला आहे. आता त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया.
  • आपला ढोकळा तयार झालेला आहे . ढोकळा खाण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊया. तुम्ही हा रोज साठी लहान मुलांना किंवा मोठ्यांना नाश्त्यासाठी देऊ शकता हा आरोग्यासाठी उत्तम आहे. हा ढोकळा तुम्ही ओली चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

Posted

in

,

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *